shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पढतमुर्खांचा अंधविश्वास/अंधश्रद्धा हेच पर्यावरणाच्या नाशाचे कारण...?

*१६३) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता*

*पढतमुर्खांचा अंधविश्वास/अंधश्रद्धा हेच पर्यावरणाच्या नाशाचे कारण.*

मित्राबरोबर मिक्सर आणण्यासाठी गेलो होतो. मित्राने मिक्सर घेताना त्या संदर्भात एक तास सर्व चौकशी केली तेव्हाच मिक्सर खरेदी केला. अशाच प्रकारे दहा रुपयाची कोथिंबीर घेताना दहा वेळा उलट पालट करून आपण  पाहतो. मात्र स्वतःच्या शरीरावर वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरने सांगितलेल्या औषधांवर डोळे मिटून विश्वास ठेवतो. या औषधांचे शरीरावर होणारे चांगले परिणाम व दुष्परिणाम याची चौकशी आपण कधीच करत नाही. पूर्णतः विश्वासाने औषधे घेतो आणि क्रमाक्रमाने रोगावर घेतलेली औषधे शरीरातील अन्य अवयवांवर दुष्परिणाम करू लागतात व शरीर कालांतराने रोगाचे घर बनते. तोच प्रकार खाद्यतेले खाताना आपण करतो. तेलबियांचा बाजारभाव, 
तेलबियांपासून तेलाचे मिळणाऱे प्रमाण यांच्या तौलनीक दरापेक्षा कमी दरात बाजारात आकर्षक पॅकिंगमध्ये खाद्यतेले मिळतात. याचे कारण कोणी तपासत नाही. मात्र या तेलाचे दुष्परिणाम आपण भोगतो एवढे मात्र खरे. जाहिरातींवर पूर्ण विश्वास. 

            सुपीक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खतांचा वापर आणि कीटकनाशके मारून जमिनीचा पोत बिघडतो आणि जमीन विषारी होते. पिके, फुले,फळे यांचा नैसर्गिक गंध यामुळे नाहीसा झालेला आहे. मधमाशा व मानवास उपयोगी असणारे कीटक सरसकट मारले जात आहेत. परिणामी आज आपण या खते, कीटकनाशकांवरील विश्वासामुळे आपल्या जमिनी,नद्या विषमयी केल्यात हे सत्य आपण नाकारू शकतो काय?

         जाहिरातीवर आणि तथाकथित तज्ज्ञांच्या सांगण्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवून वापर करतो. दररोज वापरात असलेला साबण व त्यातील घटक खरंच शरीराला उपयुक्त आहेत काय ? आंघोळीसाठी अनेक वनौषधींनीयुक्त असे आरोग्यदायी ऊटणे आपण दररोज का वापरत नाही? का आपण ठेवतो अंधविश्वास?. या दररोजच्या अनुभवातून आपण केवळ अनुभवतो आहोत पर्यावरणाचा विनाश. डोळे मिटून आपण सद्यस्थितीत या समाज रचनेवर ठेवलेला विश्वास आणि ही श्रद्धा यावर चिंतन करा. डोळस बना. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता अभियानात सहभागी व्हा.

लेखक : 
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने.
(देशभक्तकोशकार) 
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close