पुणे । प्रतिनिधी :-
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने अनेक समाजोपयोगी विधायक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी कायदेविषयक जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आले.
आपले कायदेविषयक हक्क जाणून घेणे हे सुजाण नागरिक बनण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. आजचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या भविष्याचे पाईक आहेत आणि राष्ट्राचे उज्वल भविष्य, कायदा आणि सुव्यवस्थेवरच अवलंबून असते. म्हणूनच विद्यार्थ्यांमधे कायदेविषयक जागृती करणे हे अत्यंत महत्वाचे आहे याच भावनेतून दिनांक २० जुलै, २०२२ रोजी पुणे येथील पुणे विद्यार्थी गृहाचे महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून न्या. एम. डी. कश्यप, सचिव पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्या. चंद्रशीला पाटील, पुणे आणि न्या. गजानन कुलकर्णी, पुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाव बेटी पढाव तसेच बालकांविषयी अत्याचार या विषयांबाबतच्या विविध कायद्यांची माहिती याप्रसंगी मुलांना मिळाली.
ऍड. घनश्याम खलाटे, डॉ.ज्ञानेश्वर दाते, प्रा. विष्णू गावडे यांच्या मदतीने कार्यक्रम संपन्न झाला.
संयोजिका ऍड. नंदिनी शहासने, विश्वस्त, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

