shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर नगरपालिकेच्या निवडणूकीत सर्व जागा लढवल्या जातील - बाबासाहेब भोंग .

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर नगरपालिकेच्या  निवडणूकीत सर्व जागा लढवल्या जातील - बाबासाहेब भोंग .

ओबीसींना स्वतंत्र मतदारसंघातुन आरक्षण मिळाले पाहीजे ही आमची मागणी कायम .
इंदापूर प्रतिनिधी:ओबीसींना स्वतंत्र मतदारसंघातुन आरक्षण मिळाले पाहीजे ही आमची मागणी कायम असेल , तूर्त आम्ही सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो असे बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीत सर्व जागा लढवल्या जातील. २० उमेदवारांची यादी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती होईल असे वाटत होते. परंतु स्थानिक पातळीवर अडचणी असल्याने युती होऊ शकणार नाही. भरणे मामांच्या बद्दल नाराजी असणार नाही , आम्ही फक्त राजकारणासाठी राजकारण करत नाही तर समाज परिवर्तन हा आमचा उद्देश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा या निवडणूका वेगवेगळ्या आहेत , त्या वेगवेगळ्या प्रश्नावर लढवल्या जातात व त्यासंदर्भात त्या त्या वेळी निर्णय घेण्यात येईल अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी दिली.  
कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत व यावेळी आमचे यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले.
close