प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
सी बी एस ई बोर्ड नवी दिल्ली च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत बीड जिल्ह्यात नामांकित असलेल्या शारदा इंग्लिश स्कूल केज ने यशाची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण 98.90 टक्के आहे.
एप्रिल- मे 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14 असून 80 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेली विद्यार्थ्यांची संख्या 35 आहे. तसेच विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 56 च्या वर आहे.
शाळेमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान दोन विद्यार्थ्यांनी समान घेऊन घेतलेला आहे त्यामध्ये अनुक्रमे बीदादा वरद शैलेश 94.40 तर ठोंबरे कृष्णा राजेंद्र 94.40, शाळेत सर्व द्वितीय येण्याचा मान थोरात देवयानी धनंजय 94.20 तर तृतीय येण्याचा मान शिनगारे वैष्णवी राम 93.80 हिने पटकावला आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव मा रमेशराव आडसकर यांनी केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत,तसेच प्राचार्य मिश्रा एस एम, देशमुख पी एम,उपप्राचार्य सुरज सन्नी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
मा आमदार श्री बाबुरावजी आडसकर साहेब ( तात्या) यांच्या आशीर्वादाने व मा रमेशराव आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील मुलांना अल्प फीस मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प शारदा इंग्लिश स्कूल स्थापनेवेळी करण्यात आला होता,त्यात आम्हाला यश प्राप्त झाले असून गत अकरा वर्षापासून शारदा इंग्लिश स्कूल केज ने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. कोरोणाच्या जीवघेण्या काळात विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या शिक्षक वृंदानी व आयटी सेलच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे व विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे हे फलित आहे, यशा बद्दल सर्वांचे अभिनंदन.
अर्चनाताई रमेशराव आडसकर

