shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज नगरपंचायतचा अजब कारभार नागरिकांनी विरोध करून पहिले बिअर बार हटवले नगर पंचायतने त्याच ठिकाणी दुसऱ्या बिअर बार ला ना हरकत दिली!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 

शहरातील मध्यवर्ती भागात नेहरू नगर आहे बस स्टॕन्ड जवळील भागात मद्यपींचा नेहमीच राबता जास्त असतो याचा परिणाम हा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना व महिला यांना मोठ्या प्रमाणात त्रास आसतोच . याठिकाणी दवाखाना आहे व्यापारी दुकाने आहेत याचा वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पहिले त्या ठिकाणी असणारे बिअर बार पाठ पुरावा करून हटवले होते .


यासंबधात जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागास देखील सांगितले होते परंतु . नगर पंचायत कडे तिथेच पुन्हा दुसरे बिअरबार सुरू करण्यासाठी ना हरकत मागितली आणी नगर पंचायत ने लागलीच दिली त्यामुळे नेहरू नगर भागातील नागरिकांना पुन्हा आंदोलना शिवाय पर्याय नाही असे दिसून येते . 

नागरिकांनी नगर अध्यक्ष यांच्या कडे निवेदन दिले आहे  नेहरू नगर भागातील नागरिकांनी  दि.15/06/2021 , 09/06/2022 व 05/07/2022 रोजी नगर अध्यक्ष यांना  समक्ष भेटून न.पं. केज हद्दीतील घर क्र.3776 व 2491 सिटी सर्व्हे नं.2289 या मालमत्तेत अनंत भाऊराव रोडे हे नवीन बिअर बार व परमिट रूम चालू करणेसाठी प्रयत्नात असल्या बाबतची खात्रीलायक माहिती  एक वर्षांपूर्वी मिळाली होती तेव्हा सर्व नागरिकांनी निवेदन दिले होते व नं. पं. कार्यालय केज यांनी दिलेले नाहरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती ,परंतु त्यावर आजतागायत नगर पंचायत कडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही .
     

या साठी मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी सं. क्र.2021/ आर बी / डेस्क - 2/ पोल -2/ निवेदन / का वी - 32671 दि.20/08/2021  व सं. क्र .2022 / आर बी - डेस्क 2 / पोल 1 / निवेदन 27620 दि.09/06/2022 अन्वये मुख्यधिकारी न.पं. केज यांना कार्यवाहिस्तव पत्र पाठवले होते त्याची देखील दखल आजतागायत  घेतलेली नाही. 

यामुळे अनंत भाऊराव रोडे यांना दिलेले नाहरकत प्रमाणपत्र येत्या आठ दिवसात रद्द करावे अन्यथा  नेहरू नगर मधील महिला व नागरिक दि.27/07/2022 पासून न.पं. कार्यालय केज समोर आमरण उपोषणास  बसणार आहेत असे निवेदन नगर पंचायत ला दिले आहे
close