शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-नगर तालुक्यातील अनेक गावा गावात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेती रस्ता, शिव रस्ता, पाणंद रस्ते,गाडी वाट,पाय वाट,वहिवाट रस्ता बंद करण्याचे प्रकार व वाढत चाललेले आहे.या प्रकरणा मुळे शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. यांच प्रत्यय दहिगाव मधील अनेक शेतकऱ्यांना येत आहे. मौजे दहिगाव वाळकी हद्दीवरील पारंपारिक शिव रस्ता काही ईसमाने आडमुठ्या भुमिकेतुन पुर्वीचा रस्ता जिसेबी यंत्राच्या साह्याने चर खोदुन शिव रस्ता बंद केला आहे. या मुंळे शिंदे वस्ती, कालेॅ वस्ती व दहिगाव मधील शेतकरयांना शेती वहिवाट करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी मोठी लोकं वस्ती वसलेली आहे. या ठिकाणी शाळकरी मुलांना शाळेत ये -जाण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टॅक्ट्रर, बैलगाडी, कोणत्याही प्रकारचे अवजारे सध्या घडीला घेऊन जातात येत नाही.
शेती वहिवाट रस्त्यावरून एकमेकांचे जिव घेण्यापर्यंत भांडणे होताना दिसत आहेत. नगर तालुका पोलिस स्टेशन मध्ये शेती वहिवाट वाद अनेक केसेस, एनसी दाखल होत आहेत. शेती संबंधित पोलिस विभागाला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नसलेल्या हा सर्व वाद विवाद प्रश्न शेवटी महसुली विभागाच्या निगडित तहसील कार्यालयांशी संबंधित असल्याने या ठिकाणी विवाहित नमुन्यात अर्ज दाखल करण गरजेच असत. संबंधित शेतात शिव रस्ता वहिवाट रस्ता विषयी सातबारा उतारे,गाव नकाशा ,सर्व सविस्तर माहितीसह तहसील कार्यालय अर्ज सादर केल्यानंतर तो कधी रेकॉर्ड येणार हे रामभरोसे असते. ईकडुन तिकडुन रेकॉर्ड वर आल्यानंतर वादी प्रतिवादी समक्ष पंचनामा यात अनेक शेतकरी आडमुठी भुमीका स्विकारात आल्याने तारिख पे तारीख पडत असते शेती वहिवाट मध्ये समझोता हा मोठा मार्ग असल्याचं जाणकार मतं आहे.
शेतात जाण्यासाठी रस्ता पाहिजे असेल तर तुमची रस्ता मागणी अर्ज करण्याची तयारी असेल तर, महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 143 तहसिलदारांकडे 99 रस नवीन रस्ते मागणी करता येते. आधीचा उपलब्ध रस्ता कोणी अडवले असेल तर तो मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 नुसार, तहसीलदारांना रस्त्याची अर्ज करून देखील मागता येते.
नगर तहसील कार्यालय मार्फत अनेक शेती वहिवाट अर्ज निकाली काढण्यात येत असतात.तेवढ्या प्रमाणावर पुन्हा अर्ज दाखल होत आहे. अनेक शेती रस्ता प्रकरणं अपिल उपविभागीय अधिकारी नगर यांच्या कार्यलयात दाखल होत आहेत. नगर-सोलापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या ठिकाणी जमीनीला मोठ्या प्रमाणावर बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी फुटा फूटाचा विचार करत असल्याचे दिसून येते आहे.
शेतीसाठी रस्ता वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. यात नगर तहसीलदार यांची भुमिका अंत्यंत महत्वाची असल्याने शेतकरी वर्ग न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.शेतकरयांना शेती करण्यास सुलभा व्हावी अशी अपेक्षा शेतकरी ग्रामस्थ करत आहे.दहिगाव या ठिकाणी शिव रस्ते,पायवाट,शिव रस्ता वहिवाट रस्ते तांदळी बांध (नगर रस्ता) हे नकाशा प्रमाणे रस्ते खुले करण्याची मागणी तहसीलदार नगर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावर सरपंच मधुकर म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के, विनायक वाघ, अजिनाथ वाघ, राजु शिंदे, किशोर शिंदे, सुदाम म्हस्के, शिवाजी शिंदे, शिवा म्हस्के, बाबासाहेब शिंदे, विकास म्हस्के, जयराम वाघ,आसाराम विघ, किसन वाघ,नाना गायकवाड विठ्ठल म्हस्के ,निलेश म्हस्के आदी दहिगाव ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.




