shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धुमाळवाडीतील जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबानगर विद्यार्थ्यांचा चित्रकला व वकृत्व स्पर्धामध्ये तालुका पातळीवर डंका.

धुमाळवाडीतील जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबानगर विद्यार्थ्यांचा चित्रकला व वकृत्व स्पर्धामध्ये तालुका पातळीवर डंका.


लहान गटामधून चित्रकला स्पर्धेत नियती संभाजी निकम ( इयत्ता दुसरी) हिचा प्रथम क्रमांक.
इंदापूर प्रतिनिधी:अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ तालुका बारामती येथे    अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला व वकृत्व स्पर्धामध्ये जवळजवळ बारामती तालुक्यातील नऊ ते दहा शाळा या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते .यामध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगर या शाळेच्या लहान गटामधून चित्रकला स्पर्धेत नियती संभाजी निकम ( इयत्ता दुसरी) हिचा प्रथम क्रमांक व मोठा गट यामधून प्रणिती नितीन तावरे( इयत्ता आठवी) हिचा उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला तसेच तनिष्का राजेंद्र भोसले( इयत्ता आठवी) हिचा वकृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थक क्रमांक पटकावला .
 विषेश म्हणजे धुमाळवाडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल  उस्फूर्तपणे सहभागी झाल्याबद्दल व विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास वाढविल्या बद्दल शाळेच्या प्रिन्सिपल  स्वरांजली विनोद जगताप मॅडम यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . पालक ,शिक्षक ,ग्रामस्थ अशा विविध स्तरांमधून तसेच स्कूलचे अध्यक्ष  विनोद जगताप सर यांनी विद्यार्थीचें  अभिनंदन केले.
close