शिर्डी प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थानमध्ये सन २००० पासुन काम करणा या कामगारांचा कंत्राटी हा शब्द काढुन त्यांना साईबाबा संस्थानच्या आस्थापनेवर घेण्यात यावे. अशा मागणीची निवेदन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
त्यावेळी त्यांच्या समवेत लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा या उपस्थित होत्या. दिलेल्या निवेदनावर तात्काळ प्रस्ताव सादर करा असे लेखी आदेश संबंधित खात्याला दिले. संस्थानच्या कर्मचाऱ्यांना न्याय देवु असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वाढदिवसाच्या पुर्वसंधेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर या निवासस्थानी भेट घेवुन त्यांना शिर्डी संस्थानच्या कामगारांच्या प्रश्नाविषयी निवेदन देवुन पिपाडा दाम्पत्याने साईबाबांची मूर्ती देवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीही उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की अजुन कीती दिवस कर्मचा-यांनी श्रद्धा व सबुरी ठेवावी गेल्या २२ वर्षापासुन साईबाबांची सेवा करीत असताना कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भातील प्रश्नावर सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे.
या कर्मचान्याच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्यात यावा. २००४ साली आम्ही शिर्डी ते मंत्रालय अशी पायी दींडी काढण्याचे आंदोनल करण्याची घोषणा केल्यानंतर १०५२ कामगारांना न्याय मिळाला. संस्थानने उर्वरित कामगारांना टप्प्या-टप्प्याने घेवु असे आश्वासन दिले होते परंतु बरेच कामागार निवृत्त झाले तरी ते झाले नाही. या गोरगरीब कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी चर्चे दम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

