shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोळपेवाडी मौजे सुरेगाव कन्या विद्यालय वृक्ष दिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न..!

शिर्डी प्रतिनिधी : 
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

         आज पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची हानी होत आहे, जंगलतोड होत आहे. सगळीकडे काँक्रीटचे जंगल पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना, समाजाला वृक्षांचे महत्त्व समजावे, पर्यावरण संतुलन, वृक्ष संवर्धन, संरक्षण व लोक जागृती बालवयामध्येच या विचाराचे धृडीकरण व्हावे तसेच समाजामध्ये पर्यावरण जागृतीचा संदेश जावा हा उद्देश ठेवून राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर यांच्यावतीने वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले. सदर वृक्षदिंडी ही विद्यालयापासून निघून कर्मवीर शंकरराव काळे स्मृति उद्यान येथे नेण्यात आली.       
          विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींचे कोसाका उद्योग समूहातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. उद्यानातील भव्य मैदानावर विद्यार्थिनींनी रिंगण करून टाळ मृदुंगाच्या जयघोषात ताल धरत छान नृत्य सादर केले. कोळपेवाडी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नामदार श्री आशुतोष दादा अशोकराव काळे, वाईस चेअरमन दिलीपराव बोरणारे , कार्यकारी संचालक सुनील कोल्हे साहेब तसेच इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 

             त्यानंतर शालेय परिसरात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू पिराजी कोळपे,शालेय व्यवस्थापन विकास समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब ढोमसे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे,पर्यवेक्षक सुरेश खंडिजोड,ज्युनिअर कॉलेज  विभाग प्रमुख अंगद काकडे, गुरुकुल विभाग प्रमुख  प्रभाकर आभाळे, वृक्षदिंडी प्रमुख स्मिता पाटील, हरित सेना प्रमुख राजेश वाघमारे,ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण कोल्हे, ज्येष्ठ शिक्षिका  अनिता पाटील व इतर शिक्षकांच्या हस्ते 25 कडुलिंब झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थिनींना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्ष संरक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव छाया काकडे यांनी यावेळी विद्यार्थिनींना करून दिले. या वृक्षदिंडी साठी इयत्ता पाचवी क व सहावी क च्या विद्यार्थिनी ह्या नऊवारी पोशाखात  उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थिनींचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. 

           सदर वृक्षदिंडी चे आयोजन विद्यालयातील गुरुकुल प्रकल्प व हरितसेना अंतर्गत मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली  गुरुकुल विभागाचे प्रमुख प्रभाकर आभाळे यांनी केले व यशस्वीतेसाठी उपशिक्षिका स्मिता पाटील यांनी केले व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका पाटील अनिता व वसावे मंगला,  देशमुख गणेश, वसावे सुमन,वसावे नरसिंग, लोहकरे मनोहर ,ज्युनिअर कॉलेज  शिक्षक आरोटे भाऊसाहेब ,पवार नवनाथ, कुलकर्णी विक्रम,वैराळ सुनील,वैद्य प्रवीण,  यांचे अनमोल सहकार्य लाभले.
close