shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूर तर्फे पडस्थळ येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

रोटरी क्लब ऑफ इंदापूर तर्फे पडस्थळ येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या सामाजिक बांधिलकीचे होत आहे  कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी पडस्थळ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंदापूर रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप केले. रोटरी क्लबचे संजय दोशी, धरमचंद लोढा, दशरथ भोंग, प्रशांत घुले, नितीन शहा, प्रकाश बलदोटा, महेंद्र गुंदेचा, श्री. बोंद्रे यांनी प्रथम शाळा परिसराची पाहणी केली. गेल्यावर्षी रोटरी क्लब ने वृक्षारोपण केले होते. त्या झाडांचे संवर्धन जि. प. शाळेने व्यवस्थित केले होते. त्याबद्दल रोटरी सदस्यांनी पडस्थळ शाळेस धन्यवाद दिले.
या गणवेश वाटप प्रसंगी बोलताना नरेंद्र गांधी म्हणाले की, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे आहोत. यासाठी काही अडचण आल्यास रोटरी सदस्य म्हणून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पडस्थळ शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव व सहशिक्षक सुरेश घोळवे यांनी शैक्षणिक गुणवत्ता टिकविली आहे. याबद्दल गांधी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. राज्यस्तरीय मंथन परीक्षेत पडस्थळ शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. गणवेशासोबत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


close