shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा नगर परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची आत्महत्या


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/  करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक किशोर भागवत (वय - ४८) यांनी पोफळज येथील रेल्वे रूळावर आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे. भागवत यांच्या खिशातील एटीएम कार्ड व मोबाईलवरून त्यांची ओळख पटली आहे.

किशोर भागवत करमाळा नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी माया भागवत या सिताबाई परदेशी प्राथमिक शाळेच्या  मुख्याध्यापिका आहेत. भागवत हे मोटरसायकल वरून पोफळज ला गेले यांनी मोटारसायकल बाजूला लावून रेल्वेरूळावर उभा राहून आत्महत्या केली असून, त्यात जोराच्या धडकेत त्यांचा चेहरा उध्वस्त झाला असून पाय तुटलेला आहे. त्यामुळे त्यांना ओळखणे तसे कठीण गेले परंतू जवळील वस्तूवरून त्यांची ओळख पटली आहे.

 आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. भागवत यांच्या मागे त्यांच्या पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
close