खेड | प्रतिनिधी :
"खेड सेझ पंधरा टक्के (१५%)परता प्रश्नसंदर्भात बाधित शेतकरी प्रतिनिधीच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री यांना पाठविले निवेदन-परतावा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधितांचीसंयुक्त मिटिंग घेऊन त्वरित शासकीय पातळीवर प्राधान्याने प्रश्न सोडवण्याचीकेलीविनंती!"
पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर तालुक्यात सेझ प्रकल्प २००८ मध्ये अस्तित्वात आला. सदर प्रकल्प सुप्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी (के.ई. आय.पी.एल. ) यांचा असून या प्रकल्पांतर्गत कनेरसर ,केंदुर, निमगाव, दावडी, गोसासी, या गावांची १२२५ हेक्टर जमिनीचे संपादन हेक्टरी १७ लाख ५० रुपये दराने करण्यात आले.
जमीन संपादनाच्या वेळेस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे. म्हणून पंधरा(१५%) टक्के परतावा. विकसित प्लॉट च्या स्वरूपात देण्याचे ठरविण्यात आले होते. आणि त्यासाठी संपादन मोबदल्यात २५ टक्के(अंदाजे ५७ कोटी )रक्कम विकसन मूल्य म्हणून जमीन संपादनाच्या वेळेत शेतकऱ्यांच्या मोबदल्यात कपात करण्यात आले होते.
परंतु नंतर सोयीस्कररित्या १५% टक्के परतावा विकसित प्लॉटच्या स्वरूपात देण्याऐवजी त्यामध्ये बदल करून खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी(के. डी. एल.) स्थापन करून तिचे भागधारक शेतकऱ्यांना अज्ञानीपणाचा फायदा घेऊन बनविण्यात आले. के.डी.एल.(खेड डेव्हलपर्स लिमिटेड) कंपनीचे कामकाज गेले १३ वर्षापेक्षा अधिककालावधी होऊनही फक्त कागदपत्रे आहे. वर्षातून एकदावार्षिक सर्वसाधारण सभा घेणे व खर्चाला मंजुरी देणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक /नुकसान झाले आहे. परतावाही नाही आणि कंपनी चालू नाही. अशी अवस्था झाली आहे.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी या प्रश्नासंदर्भात प्रशासनाला व संबंधित विभागाला निवेदन दिली, वेगवेगळी आंदोलने केली. परंतु अद्याप पर्यंत हा प्रश्न सुटला नाही.
त्यासाठी दिनांक ११/७/२०२२ रोजी खेड सेझ बाधित पंधरा टक्के परतावा धारक शेतकऱ्यांच्या वतीन महाराष्ट्र राज्याचे निर्वाचित मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे,आणि उप-मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात मुख्यता मा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, एम.आय.डी.सी मुख्य कार्यकारी अधिकारी, के.ई. आय. पी. एल. प्रतिनिधी, के.डी. एल. प्रतिनिधी , १५ टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधी, यांची संयुक्त मिटिंग घेऊन हा प्रश्न शासकीय पातळीवरकायमस्वरूपी मार्गी लावावा. अशी विनंती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदना साठी, मा. श्री. काशिनाथ हजारे, विश्वास कदम दादाभाऊ जैद,प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, भानुदास नेटके,मारूतराव गोरडे, निलेश म्हसाडे,गुलाब हजारे, गणेश कान्हुरकर या बाधित शेतकरी प्रतिनिधी पुढाकार घेतला.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री या प्रश्नात नक्की लक्ष घालतील. व संयुक्त मीटिंग घेऊनहा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.

