shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील नव्याने उदयास आलेल्या नगरपालिकेच्या कारभाराचा माजी उर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आढावा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ११ जुलै २०२२

नगर तालुक्यातील नव्याने उदयास आलेल्या नगरपालिकेला भेट देत सबंधित अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेत घेतला आढावा.

अहमदनगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या गावांची मिळून नुकतीच नवीन नगरपालिका स्थापन झाली आहे. दुर्दैवाने जून अखेरपर्यंत राज्यातील कोणतीही बदली न करण्याचा शासन निर्णय व नंतर उद्भवलेली राजकीय अनिश्चितता यामुळे काही प्रमाणात नवीन नगरपालिकेच्या कारभारावर प्रतिकूल परिणाम झाला होता. 

म्हणून सोमवारी दुपारी माजी उर्जाराज्य मंत्री तसेच राहुरी- नगर-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नागरदेवळे येथे भेट देऊन संबंधित अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन आढावा घेतला. 
"राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून केलेले काम व नगरविकास खात्याचा राज्यमंत्री पदाचा अनुभव पणाला लावून या नवीन नगरपालिकेसाठी योग्य त्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे - माजी उर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे."

       जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माजी उर्जाराज्य मंत्री यांनी दूरध्वनीद्वारे सुचना करून तातडीने या नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार जवळच्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्याची सुचना त्यांनी केली.
तसेच गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या योग्य त्या सुचना देण्यात आल्या. भविष्यात कचरा डेपोसाठी शासकीय जागा बघण्याची सुचना देखील तहसीलदारांना केली.
तर लवकरच या नगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी योजना करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.


Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600




close