निर- निमगाव सोसायटीच्या चेअरमन पदी रणजीत घोगरे तर व्हाईस चेअरमन पदी आबा दादा जाधव यांची बिनविरोध निवड.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील मौजे निर- निमगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी रणजीत दत्तात्रय घोगरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी आबा दादा जाधव यांची बिनविरोध निवड दि.७ जुलै रोजी करण्यात आली.
निर- निमगाव सेवा सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार दणदणीत निवडून आले. आज दिनांक ७ जुलै २०२२ रोजी चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक इंदापूर येथील सहाय्यक निबंध कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी. गावडे यांच्या उपस्थितीखाली पार पडली. यामध्ये चेअरमन पदी उच्चशिक्षित तरुण रणजीत दत्तात्रय घोगरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी आबा दादा जाधव यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय घोगरे व नवनिर्वाचित सर्व संचालक गावातील आजी-माजी चेअरमन माजी सरपंच गावातील सर्व प्रमुख प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवनिर्वाचित चेअरमन व
व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले.

