वालचंदनगर सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूकित स्वाभिमानी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील - संजय नकाते .
वालचंदनगर सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी शनिवारी होणार मतदान
इंदापूर प्रतिनिधी:वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक २०२१-२२ ते २०२६-२७ ची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून दिनांक ९ जुलै २०२२ रोजी मतदान होणार असून स्वाभिमानी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असे पॅनल प्रमुख संजय नकाते यांनी माहिती देताना सांगितले.
स्वाभिमानी सहकारी पॅनल हे भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रचार प्रमुख संजय नकाते यांच्या नेतृत्वाखाली वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक निवडणुकीच्या रणधुमाळीत एकूण १२ उमेदवार कपाट या चिन्हावरती निवडणूक लढवत असून या निवडणुकीसाठी मतदान दिनांक ९ जुलै २०२२ रोजी होणार असल्याची माहिती नकाते यांनी दिली.
स्वाभिमानी सहकारी पॅनलचे उमेदवार खालील प्रमाणे:
सर्वसाधारण मतदार संघ
१) संतोष हनुमंत गायकवाड
२) विठ्ठल नामदेव चव्हाण
३) शरद अर्जुन चव्हाण
४) संदीप परशुराम फाळके
५) संजय नारायण भरते
६) शशांक सुधाकर माडगे
७) राजेंद्र सूर्याजी रणमोडे
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग
८) विजय शिवाजी अर्जुन
इतर मागास प्रवर्ग
९) विजय सोपान मस्के
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
१०)जीवन लक्ष्मण भोरे
महिला प्रतिनिधी
११)सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी
१२) सौ पार्वती गोविंद बनसोडे.

