शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी परिसरातील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कामात सदैव अग्रेसर असणारे साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय भाऊ कोते हे नाव प्रख्यात आहे शिर्डी माझे पंढरपुर साईबाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला कीर्तन सोहळा शिर्डी येथे व्हावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे.
असा दृष्टांत देखील काही भक्तांना झाला व तो अनुभव भक्तांनी परम साईभक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय भाऊ कोते यांना सांगितला व हा बाबांचा आदेश समजून विजुभाऊ यांनी ठरवले की आषाढी एकादशी निमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आठवी कीर्तनाची सेवा विजयराव कोते यांचे सासरे कै.बाबासाहेब चंद्रभान आहेर लोणी यांचे स्मरणार्थ करण्यात येणार आहे. सेवा रविवार दिनांक 𝟏𝟎/𝟕/𝟐𝟎𝟐𝟐 रोजी सायंकाळी 𝟎𝟕/𝟎𝟗 वा किर्तन सोहळा होणार आहे कीर्तनाचे ठिकाण विजुभाऊ कोते यांचे वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्यातील किर्तन श्रवणाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा असे श्री साई निर्माण उद्योग समूहाची अध्यक्ष विजुभाऊ यांनी केले आहे.

