शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
श्रीलंका: आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. नंतर या घराला त्यांनी आग लावली. तसेच या परिसरातील गाड्यांचं नुकसान केलं.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली असून देश मोठ्या संकटाला तोंड देत आहे. महागाईने उच्चांक गाठला असून देशावर कर्जाचा भलामोठा डोंगर उभा राहिला आहे. देशात अन्नधान्याचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या गोताबाया सरकारविरोधात जनक्षोभाचा भडका उडाला असून याला आता हिंसक वळण लागलं आहे.
रानिल विक्रमसिंघे यांनी मे महिन्यामध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

