shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूकित स्वाभिमानी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजय - पॅनल प्रमुख संजय नकाते यांची माहिती.

वालचंद नगर सहकारी बँकेवर  स्वाभिमानी सहकारी पॅनलचा विजय झेंडा..

वालचंदनगर सहकारी बँक  संचालक मंडळ निवडणूकित  स्वाभिमानी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजय - पॅनल प्रमुख संजय नकाते यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी:वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक २०२१-२२ ते २०२६-२७ ची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून दिनांक ९ जुलै २०२२ रोजी मतदान झाले असून स्वाभिमानी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार  दणदणीत निवडून  आले आणि पहिल्यांदाच इतिहास घडला असे पॅनल प्रमुख संजय नकाते यांनी माहिती देताना सांगितले. 
स्वाभिमानी सहकारी पॅनल हे भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रचार प्रमुख संजय नकाते यांच्या नेतृत्वाखाली वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक निवडणुकीच्या रणधुमाळीत एकूण १२-० उमेदवार कपाट या चिन्हावरती विजय झाले. या निवडणुकीसाठी मतदान दिनांक ९ जुलै २०२२ रोजी झाले असून मतदान झाल्यानंतर मतमोजणी झाली .
स्वाभिमानी सहकारी पॅनलचे विजय उमेदवार खालील प्रमाणे:
सर्वसाधारण मतदार संघ
१) संतोष हनुमंत गायकवाड
२) विठ्ठल नामदेव चव्हाण
३) शरद अर्जुन चव्हाण
४) संदीप परशुराम फाळके
५) संजय नारायण भरते
६) शशांक सुधाकर माडगे
७) राजेंद्र सूर्याजी रणमोडे
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग
८) विजय शिवाजी अर्जुन
इतर मागास प्रवर्ग
९) विजय सोपान मस्के
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
१०)जीवन लक्ष्मण भोरे
महिला प्रतिनिधी
११)सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी
१२) सौ पार्वती गोविंद बनसोडे.

वालचंदनगर चे उपसरपंच व पॅनल प्रमुख श्री संजय नकाते व सर्व विजयी उमेदवार  यांचे राज्याचे माजी सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील ,नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील इंदापूर अर्बन बँक चे व्हाईस चेअरमन  सत्यशील पाटील, विश्वजित तावरे सर,वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड, विक्रमसिंह मोरे, संतोष कदम ,यांनी अभिनंदन केले.सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत सर्व कामगार बंधू यांनी भाजप प्रणित भारतीय मजदुर संघ यंच्यावर्ती विश्वास दाखवला ह्या बद्दल वालचंदनगर चे उपसरपंच व पॅनल प्रमुख श्री संजय नकाते यांनी सर्वांचे आभार मानले.मागील ७ वर्षात सलग दोन वेळेस ग्रामपंचायत व दोन वेळेस वालचंदनगर सहकारी बँक ताब्यात घेवून वालचंदनगर भाजप ने दमदार कामगिरी केली आहे व राष्ट्रवादी चा गड समजणाऱ्या वालचंदनगर मध्ये सुरुंग लावला.आता लक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद आहे असे इंदापूर अर्बन बँक चे व्हाईस चेअरमन श्री सत्यशील पाटील यांनी सांगितले.
close