पंढरपूर : १० / आज तीन वर्षा नंतर पुन्हा आषाढी एकादशी निमित्ताने भक्तांच्या मेळ्याने पंढरपूर भक्तीरसात न्हावून निघाले आहे. साधारण २१ दिवसाचा ऊन पाऊस,थंडी यांची परवा न करता केवळ विठ्ठलाच्या अनामिक ओढीने माझा शेतकरी, कष्टकरी, कामगार, भक्त भाविक आज पंढरपूर मध्ये दाखल झाला आहे.
या विश्वविधात्याच्या दर्शनाची आसच भक्तांना दर्शनासाठी मजबूर करते की घरी कितीही कामं, विघ्न असलं तरी या धावपळी, इन्स्टंट जगात एकवीस दिवस अखंडपने घर,दार, लेकरं, बाळ,संसार, शेती प्रपंचा सगळं सोडून केवळ विठ्ठलाच्या ओढीन येत असेल हाच मोठा त्याग आहे. ही त्यागाची भावना हिच विठ्ठल ची देणं आहे.
एवढंच नाही तर जगात जी समता आहे ती केवळ पुस्तकं, ग्रंथ, पोथी, ओव्या मध्ये नसून ती प्रतक्षात आचरणात आणण्याची गोष्ट आहे. याच जिवंत चित्रण पंढरपूर च्या प्रत्येक वारीत दिसून येत.
या पांडुरंगा च्या वारीत कोणी श्रेष्ठ, कनिष्ठ, कोणी गरीब, श्रीमंत, कोणी उच्चं,नीच, कोणी आवडता कोणी नावडता हा भेद नसतोच..
यासाठीच तर प्रत्येक भक्त हा एकमेकांच्या चरणी लीन होतो. जे चित्र समस्त पृथ्वीतला वर कुठंही पहायला मिळत नाही. हेच माझ्या पंढरीचा वैशिस्ट पूर्ण भाव आहे. तो केवळ पंढरीतच पहायला मिळेल. लिनता जगासमोर आणण्यासाठी पंढरीचा वारकरी भक्त जबाबदार आहे.
पंढरपूर च आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समता, ही समता सर्वदूर पसरवण्यासाठी देशातील सर्व वारकरी भक्तांनी मोठी परंपरा जपली आहे. प्रत्येक जाती, धर्मातील लोकांच योगदान या वारकरी संप्रदायला मोठं आणि प्रतिष्ठा देण्यात आहे. प्रत्येक जाती धर्मातील संतांनी या संप्रदायसाठी प्रयत्न केले आहेत. अगदी संत ज्ञानेश्वर, निवृत्ती सोपान मुक्ताबाई ब्राह्मण,संत नामदेव शिंपी,कन्होपात्रा वेश्या, संत चोखामेळा महार, संत तुकाराम कुणबी,संत नरहरी सोनार , बाबा याकूत मुस्लिम, संत रोहिदास, चांभार, संत गोरोबा कुंभार, अशा कितीतरी संतांची मांदिआळी पंढरपूर चा लौकिक वाढवण्यासाठी आणि त्या योगे माणसातल माणुसपण जपण्या साठी अहोरात्र प्रेम रुपी, भक्ती रुपी यज्ञ करीत होते. यांच छोटया छोटया प्रवाहतून भक्तीचा प्रचंड मोठा प्रवाह तयार झाला आहे. जो या प्रवाहात सामील झालाय निश्चितच त्यांच्या जीवनाच कल्याण झाले आहे.
म्हणून तर विठू माझा लेकूरवाळा
संगे गोपालांचा मेळा* अशी संत वानी अनेक महात्मानी केली आहे..
आजपर्यंत अनेक देवातांच दर्शन घेण्याचा योग आला मात्र थेट आपल्या आराध्य दैवताच्या गाभाऱ्यात जाण्याचा, आणि थेट आराध्याला स्पर्श करण्याच चरण सुख कुठं मिळत असेल ते केवळ आणि केवळ फक्त पांडुरंगा च्या दर्शनातच होत हे एक जागतिक सत्य पंढरपूर मध्येच पहायला मिळत.
यामधून एक वैश्विक संदेश असा आहे की ईश्वर आणि भक्त यामध्ये दैत्व, दैवत्व नाही तर प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे. कोणी परमेश्वर हुन वेगळं नाही. फक्त आपल्या मनामध्ये असणारा मळ अर्थात कामं, क्रोध, मद, मोह, मस्सर, असुया या गोष्टी चा त्याग केला तर प्रत्येक जण ईश्वराची प्राप्ती करू शकतो हाच संदेश माझा विठुराया युगान युगे कमरेवर हात ठेऊन देत आहे..
शिर्डी एक्सप्रेस टीम कडून सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशी च्या विठ्ठलमय हार्दिक शुभेच्छा .

