*भिमाई आश्रमशाळेत दिवंगत पँथर रत्नाकर मखरेंची (तात्या) ७१ वी जयंती साजरी*.
( *विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती*.)
*इंदापूर प्रतिनिधी ( दि.९ ) :- येथील माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष दिवंगत पँथर रत्नाकर मखरे यांच्या ७१ व्या जयंतीचा कार्यक्रम भर पावसात भिमाई आश्रमशाळेत पार पडला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले .
दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमापूजना नंतर बुद्ध पुजा भंते धम्मसार (किल्लारी,लातूर), बौद्धाचार्य बाळासाहेब सरवदे यांच्या हस्ते व आयु. शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे,संतोष मखरे, ॲड. समीर मखरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी बामसेफचे राष्ट्रीय महासचिव व्याख्याते प्रा. डी.आर. ओहोळ सर म्हणाले की, दिवंगत रत्नाकर मखरे हे बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारा लढवय्या योद्धा होते. त्यांची राजकीय सुरुवात ही दलित पँथर संघटनेतून झाली. त्यांचं जीवन हे संघर्षमय होतं.गोरगरिबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा झुंजार नेता अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित व कष्टकरी घटकांसाठी काम केलं.
तात्या हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, लढवय्ये नेते होते. त्यांचे जनहितासाठीचे योगदान मोलाचे राहिले आहे. असे गौरोद्गार जयंतीदिनी प्रा. ओहोळ सरांनी व्याख्यानात काढले.
संस्थेतील इ.१० वी, इ.१२ वी. बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.
यावेळी गटनेते कैलास कदम,प्रा. कृष्णा ताटे, माऊली नाचण, शकीलभाई सय्यद,वैभव गिते (राज्य सचिव NDMJ संघटना), ॲड.समीर टिळेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गायिका सुषमा देवी यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले, तर आभार ॲड. राहुल मखरे यांनी मानले.

