बाळ-गोपाळांच्या विठू माऊली जयघोषाने शहरात भक्तीमय वातावरण.. !!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
प्रतिवर्षाप्रमाणे शारदा इंग्लिश स्कूल केज ची आषाढी दिंडी आषाढी एकादशीनिमित्त शहरात काढण्यात आली यामध्ये शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विठू माऊलीच्या रूपात विद्यार्थी व विद्यार्थिनी पाहताना शहरातील लहान-थोर मनोमन सुखावत होते.दिंडीची सुरुवात पंचायत समिती मैदानापासून करण्यात आली ठीक, ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात येत होते. या प्रसंगी छत्रपती शिवाजी शिक्षण चे सचिव तथा भाजपाचे नेते रमेशराव आडसकर यांनी विठुरायाचे पूजन केले. शारदा इंग्लिश स्कूल केज ने अतिशय सुंदर नियोजन केल्याचे दिसून येत होते.
दिंडीची सुरुवात पंचायत समिती मैदान येथून करण्यात आली, त्यानंतर कानडी रोड कळंब चौक येथून दिंडीने मार्गक्रमण केले. विठुनामाच्या चालीवर विद्यार्थ्यांनी बसवलेल्या पावले या उपक्रमाला पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.
या सर्व उपक्रमांमध्ये केज पोलीस विभागातर्फे अतिशय मोलाची मदत झाली. वाघमोडे साहेब, पाटील साहेब व त्यांचे सहकारी त्यांनीच चिमुकल्या बाळगोपाळांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली.
यावेळी शाळेचे प्राचार्य मिश्रा एस . यांनी केज शहरातील जनतेने दाखवलेल्या प्रेमाबद्दल व चिमुकल्यांच्या केलेल्या कौतुकाबद्दल सर्वांचे आभार मानले.

