हिंदुस्तान कॅटल फिड्स बारामती यांच्या उपक्रमांतर्गत एन.ई.एच. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर येथे २०४ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:हिंदुस्तान कॅटल फिड्स बारामती यांच्या उपक्रमांतर्गत एन.ई.एच. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर येथे २०४ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे, हिंदुस्तान कॅटल फिडस वरिष्ठ विक्री अधिकारी रामदास मेटकरी, सेल्स मॅनेजर विनोद वासेकर, विक्री अधिकारी प्रदीप कदम ,माने दूध शीतकरण केंद्राचे सर्वेसर्वा महेश माने, तन्मय माने व विशाल माने तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी रामदास मेटकरी कंपनीतील वरिष्ठ विक्री अधिकारी म्हणाले की, कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासताना विद्यार्थ्यांसाठी गरजू व होतकरू हुशार विद्यार्थ्यांना मोफत वयाचे वाटप करण्याचे पवित्र कार्य हाती घेतले व त्यातून नक्कीच विद्यार्थी व पालकांना याचा फायदा होईल हा शालेय वह्या वाटपाचा उपक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्यप्रिय व कौतुकास्पद आहे .यातून अनेक गोरगरीब विद्यार्थी पालकांचा नक्कीच फायदा होईल.
या शालेय वह्या वाटपाचा उपक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्यप्रिय व कौतुकास्पद आहे .यातून अनेक गोरगरीब या आपले हस्ताक्षर सुधारण्याचा नियमित प्रयत्न करतील असे नंदकुमार सूर्यकांत रणवरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव हनुमंते यांनी केले तर मधुकर खरात यांनी सर्वांचे आभार मानले.
विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव नवरे यांनी हिंदुस्तान कॅटल फीडसच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले व विद्यालयाला केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानले

