shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वरकुटे खुर्द येथील निरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.

माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वरकुटे खुर्द येथील निरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.



इंदापूर प्रतिनिधी: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी १६ जुलैला इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे नीरा डावा कालवा फुटून पाण्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, या कालवा फुटण्याच्या घटनेमुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून त्यांना शासन स्तरावरुन मदतीसाठी मागणी केली जाईल.
यावेळी माजी राज्यमंत्री भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेट देऊन पाहणी केली व संबंधित कृषी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

माजी मंत्री भरणे पुढे म्हणाले, सणसर पासून ५९ फाट्या पर्यंत जिथे जिथे धोका आहे तिथे लायनिंगची कामे चालू होतील. मात्र सध्या कालवा वाहत आहे. तो बंद झाल्यानंतर कामांना सुरवात होईल.

यावेळी गावचे सरपंच बापूराव शेंडे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, सोसायटीचे अध्यक्ष विनोद दगडे, माजी अध्यक्ष अस्लम मुलाणी, बकुळा शेंडे, प्राचार्य शहानुर मुलाणी, विजय शेंडे, सचिन मासाळ, भिमराव शेंडे, विलास शिंदे यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
close