मोर्शी - उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे भव्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले यात 10 स्त्री कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, 2 गर्भपिशवी, 2 अंडवृद्धी व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
यावेळी विशेष उपस्थित वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर सर यांनी सर्व शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्या.यावेळी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विनोद चव्हाण सर,डॉ.रावलानी सर, डॉ.सांगोळे सर अधिपरिचरिका वगारे मॅडम,पूर्वा मनवर,अर्चना वानखडे आरोग्य सहायक श्री.अनिल जाधव,श्री.विनय शेलुरे आरोग्य कर्मचारी श्री.प्रकाश मंगळे,श्री.प्रशांत बेहरे,श्री.सुजित वानखडे, श्री.थोरात, श्री.कापडे यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.

