shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी 19 ते 21जुलै दरम्यान केवळ 10 मंत्र्यांना शपथ..!


जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती, शिंदे गटाकडून अधिकच्या मंत्रिपदाची मागणी त्याबरोबरच भाजपमध्ये मंत्रिपदासाठी होत नसलेले मतैक्य या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नाराजी नाट्य होऊन याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच १९ ते २१ जुलैच्या दरम्यान १० मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी करण्याचे नियोजन आहे.

३० जून रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यानंतर तीन आठवडे उलटून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाले नाही. भाजपला २९ आणि शिंदे गटाला ८ कॅबिनेट व ५ राज्यमंत्री अशी १३ मंत्रिपदे देण्याचे ठरले होते. शिंदे गटात ठाकरे सरकारमधील ७ मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे गटात ४० बंडखोरांसह १० अपक्ष आहेत. म्हणूनच शिंदे गटाला अधिकची मंत्रिपदे पाहिजे आहेत. ६ आमदारांमागे एक मंत्रिपद, असे सूत्र होते.

मात्र, शिंदे गटाने १९ मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्यास भाजप तयार नाही. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात नकोत. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्ष सोपवावे, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. भाजपमधील या चढाओढीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागला आहे.
close