आढाववाडीच्या विरभद्र मंदिराचा होत आहे जिर्णोद्धार ;
मंदिरासाठी भाविकांनी मदत करावी - पुजारी सुभाष नाचण
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १८ / अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण गावा जवळील आढाववाडी येथील विरभद्र मंदिर नवसाला पावणारे व जागृत देवस्थान मानले जाते . पंचक्रोशीतील भाविक भक्त याठिकाणी दर्शनाला येतात .
विरभद्र मंदिराचे पुजारी श्री . सुभाष नाचण यांनी सांगितले की, समस्त गावकरी व पंचक्रोशीतील व्यक्तींचा या देवावर अगाध विश्वास आहे . नवसाला पावणारा विरभद्र म्हणुन या देवाच्या दर्शनाला अनेक भाविक भक्त येतात . सध्या या मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असून मंदिराचे संपुर्ण बांधकाम नवीन स्वरूपाचे करत आहोत . येथील सर्व गावकऱ्यांनी वर्गणी करून मंदिराचे काम सुरु केले असून मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी तसेच सभामंडपासाठी मा .खासदार प्राजक्तदादा तनपुरे यांना भेटणार असुन त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले .
यावेळी पुजारी नाचण यांनी सांगितले की, सर्व दानशुर व्यक्तींनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मदत करावी . देणगीसाठी ९८८१०२५०५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .
यावेळी अँड. विलास गवारे , सचिन आढाव, बाबासाहेब घोरपडे , नवनाथ आढाव, साहेबराव आढाव , मंदिराचे पुजारी सुभाष नाचण, चंद्रकांत वायकर , काशीनाथ आढाव, रावसाहेब आढाव , बाजीराव गवारे, शरद झेंडे ९८८१०२५०५६ ,चंद्रकांत भागवत आदी उपस्थित होते .

