प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : १८ / पोलिस बाॕईज् असोसिएशनच्या शिक्षक सेल नगर शहर उपाध्यक्ष पदी चाँद सुलताना ज्यु.काॕलेजचे मा.प्रा.वसीम उस्मानगनी शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
मा. प्रा. वसीम हे प्रथमतः पोलिस बाॕईज् असून पोलिसांच्या मुला मुलींनी देखील विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करुन अनेक क्षेत्रात ठसा उमटविला आहे .फक्त पोलिस भरती हेच ध्येय मनात न बाळगता त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक चांगले शिक्षक होऊन पोलिसांच्या मुला मुलींना आदर्श निर्माण करुन दिला आहे .
अनेक पोलिसांची मुले आरोग्य सेवेत औद्योगिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात व्यावसायात आपआपले कर्तृत्व सिध्द करत आहेत याचा पोलिस बाॕईज् असोसिएशनला सार्थ अभिमान आहे . भविष्यात पोलिसांच्या मुलामुलींनी पोलिस भरतीचा विचार न करता शिक्षक . डाॕक्टर.इंजिनियर .MPSC.UPSC.च्या माध्यमातून चांगले अधिकारी निर्माण व्हावेत असे प्रतिपादन पोलिस बाॕईज् असोसिएशनचे उपाध्यक्ष मंदार लष्कर यांनी व्यक्त केले .तर पोलिसांच्या मुलांनी प्रत्येक स्पर्धा परीक्षेत उतरुन यश संपादन करावे असे खजिनदार संकेत पवार यांनी म्हटले . Upsc व Mpsc या स्पर्धा परीक्षेत पोलिसांचे मुले सर्वांधीक यश संपादीत करुन महाराष्ट्रात इतिहास घडविल्या शिवाय राहणार नाही असे सचिव सिध्दांत ससाणे यांनी म्हटले .
अनेक अडचणी वर मात करून पोलिसांच्या मुलामुलींना मुख्य प्रवाहात आणणारे नितिन खंडागळे, गणेश लष्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यावेळीपोलिस बाॕईज् असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मा.नितिन रमेशदादा खंडागळे .उपाध्यक्ष मंदार लष्कर .सचिव .सिध्दांत ससाणे.खजिनदार.संकेत पवार.भिंगार शहर अध्यक्ष अविनाश भोईटे.संतोष जाधव.गणेश लष्कर .महेश व्यवहारे.रवी गुंड.गणेश पासकंटी.परभणे.मुन्ना शेख निलेश जाधव. आदी उपस्थित होते .

