प्रतिनिधी : निरज चांगटे
नारायणडोहो : १८ / नगर तालुक्यातील नारायणडोहो श्री चांगदेव विद्यालय येथे आज आषाढी वारी निमित्ताने दिंडी काढण्यात आली होती. मुख्याध्यापिका कुल्लाळ मॅडम , शिक्षिका कार्ले मँडम,थोरवे मँडम, ताटीकोंडा मँडम, पाचारणे मँडम,सुनील म्हस्के सर, हराळ सर,कोतकर सर,नारळे सर,मुळे सर,घुंगार्डे सुरेश सर,भरत साठे, बाळासाहेब साठे ,धोंडे सर यांनी दिंडीचे आयोजन केले होते.
शनिवार ९ जुलै रोजी श्री चांगदेव विद्यालय शाळा , नारायणडोहो येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आषाढी वारी निमित्ताने पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडी सोहळ्यात पाचवी पासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी सहभाग घेतला होता.
आज झालेल्या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह, महिला, ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते, हरीनाम जयघोष करत चांगदेव मंदिर ,नारायणडोहो येथे प्रदक्षिणा मारली. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर', अशा विठ्ठलमय वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण बनले. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. या दिंडी सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समिती व समस्त विद्यार्थी पालक इतर ग्रामस्थ उपस्थितीत होते .

