shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिनी अभिवादन*.

*भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिनी  अभिवादन*.
      *इंदापूर प्रतिनिध* :- (दि.१८) वंचित - उपेक्षितांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणारे महान साहित्यिक, लोकशाहीर, प्रबोधनकार अण्णाभाऊ साठेंचा ५३ वा स्मृतिदिन भिमाई आश्रमशाळेत साजरा करण्यात आला. 
यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात श्री.भाऊराव साळवे (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, पंचायत समिती कर्जत जि.अ.नगर) यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीस पुष्प,लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार, संस्थेचे  तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या ( तात्या) प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी), सचिव ॲड. समीर मखरे मुख्याध्यापक,प्राचार्या ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.
close