shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आँल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स वेलफेअर आँर्गेनायझेशनचे कार्यक्रम संपन्न

शिर्डी ( प्रतिनिधी )-आँल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स वेलफेअर आँर्गेनायझेशन अंतर्गत अहमदनगर जिल्हा मंडप, लाईट,फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायीक असोसिएशनच्या वतीने शिर्डी शहर अध्यक्षपदी शिर्डी शहरातील बारहाते मंडप आणी लाईट डेकोरेटर्सचे संचालक तथा साईभक्त श्री सुनील बारहाते यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


दरम्यान जानेवारी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डीत आँल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स वेलफेअर आँर्गेनायझेशन तसेच अहमदनगर जिल्हा  मंडप, प्लाँवर, लाईट डेकोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच अशाप्रकारेचे महाअधिवेशन आणी प्रदर्शन ( एक्झिबीशन ) आयोजित करण्यात येणार आहे.त्यापार्श्वभुमीवर अहमदनगर जिल्हा मंडप,लाईट प्लाँवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने शिर्डी शहर अध्यक्षपदाचा मान शिर्डी गांवचे सुपुत्र सुनिल बारहाते यांना मिळाला आहे.त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

याप्रसंगी आँल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष रामकिसन पुरोहित,सेक्रेटरी विजयसिंह परदेशी, एक्झिक्युटिव्ह मेंबर सागर चव्हाण,गोविंद शुक्ला, संजय शर्मा,प्रदिप श्रीश्रीमाळ,राहुल मुनोत, सुनील माळी, सुनील राऊत,दामोधर पांडे, विजय शिंदे,केशव डिंगोरे,विजय दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.या एक्झिबीशनमध्ये सुमारे 600 स्टाँल लावण्यात येणार असल्याचा मानस नवनियुक्त अध्यक्ष श्री बारहाते यांनी व्यक्त केला.आतापर्यंत मंडप,लाईट,प्लाँवर डेकोरेशनचे एक्झिबीशन मेट्रो सिटीत होत होते परंतु साईबाबांच्या धरतीवर अशाप्रकारचे एक्झिबीशन शिर्डी शहरात होत आहे.यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, अँटोमायझेशन सारख्या कंपण्यादेखील अशाप्रकारे शिर्डीत एक्झिबीशन ठेवतील त्याचा थेट परिणाम शिर्डी शहराच्या अर्थव्यवस्थेवर होईल असा आत्मविश्वास श्री बारहाते यांनी व्यक्त केला.


हीत्यांच्या या नियुक्तीबद्दल खा.सदाशिव लोखंडे, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते,शिवसेना नेते कमलाकर कोते,माजी उपनगरध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, मगेश त्रिभुवन, नितिन उ कोते,धंनजय गाडेकर,राहुल गोंदकर, शिर्डी शहरातून सर्वच घटकांतील मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
close