shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उदावंत व भागवत यांची व्यंगचित्रे हास्यातून समाजप्रबोधन करतात ;विशेष पोलिस महासंचालक बी. जी. शेखर यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : 
व्यंगचित्रेही बोलकी असतात, त्यांत आषयघनता असते. हजारो शब्दांचे काम एक व्यंगचित्र करते, भरतकुमार उदावंत व रवी भागवत यांच्या व्यंगचित्रांमधून हास्याद्वारे समाजप्रबोधन करण्याची ताकद आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया नाशिक विभागाचे विशेष पोलिस महासंचालक बी. जी. शेखर यांनी दिल्या.

       जागतिक अंमलीपदार्थ दिनानिमित्त जनजागृती पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने श्रीरामपूर येथील व्यंगचित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक विभागाचे विशेष पोलिस महासंचालक बी.जी.शेखर यांच्या हस्ते तर पोलिस अधिक्षक मनोज पाटील,आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपट पवार, स्नेहालयचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. हर्षल पटारे, मासोपचारतज्ञ डॉ. दिप्ती करंदीकर, विदूलता शेखर, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
उदावंत व भागवत या गुरू शिष्यांच्या जोडीने व्यंगचित्रांद्वारे व्यवसाधिनतेसारख्या गंभीर विषयाला देखील हास्याची झालर जोडली व त्यातून प्रबोधनाचा वसा घेतला ही बाब साहित्त्यीक असलेले संवेदनशिल मनाचे  पोलिस महासंचालक शेखर यांना खूप भावली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही प्रदर्शनातील व्यंगचित्रांना भरभरून दाद दिली. 

           प्रदर्शनात व्यसनमुक्तीच्या विषयावर हास्य करताना उदावंत व भागवत यांनी यमराजाचे प्रतिक वापरले होते. व्यसनांपासून मुक्त न झाल्यास यमराजाच्या सानिध्यात जावे लागते असाच काहीसा संदेश या व्यंग़चित्रांमध्ये देण्यात आला होता. यावेळी शंभरहून अधिक व्यंग़चित्रे प्रदर्शित करण्यात आली. प्रदर्शनाचा आस्वाद घेण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरीक याशिवाय अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सभागृह तुडूंब भरून गेले होते. पोलिस महासंचालकांच्या हस्ते भागवत व उदावंत यांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. 

         यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, अजित पाटील, परिघर व्यसनमुक्ती केंद्राचे मानसोपचार तज्ज्ञ मधुकर काळे, पत्रकार विजयसिंह होलमप्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते, प्रसन्न धुमाळ, पोलिस नाईक शंकर चौधरी, पोलिस कर्मचारी लोढे, दरंदले, चव्हाण आदींनी विशेष प्रयत्न केले.
close