▪️चंद्रपूर-किरण घाटे▪️
चंद्रपूर सह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असुन अनेक भागात शेतीचे व घराचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान भद्रावती तालुक्यातील पावना येथील नामे शबायाबी खान रमजान खान या ७०वर्षिय महिलेचे घर पावसामुळे दि.१२जूलैला रात्री तीन वाजताच्या दरम्यान कोसळले .यात कुठलीही प्राणहानी झाली नाही. या घरात शबायाबी खान रमजान खान पठाण व शम्मा रमजान खान राहत होते .
या दोघी मायलेकीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून अनेकदा गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना घरकुल मिळण्या करीता त्यांनी अर्ज सादर केले परंतू त्यांनी या कडे लक्ष पुरविले नाही. जिल्हाधिकारी व पंचायत समिती भद्रावती यांना देखिल अर्ज केले .
परंतु या मायलेकीला शासनाचे अद्याप घरकुल मिळाले नाही.हे विशेष !



.jpeg)
.jpeg)

