shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक पॉलिटेक्निकच्या ३२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड


श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : तालुक्यातील अशोकनगर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निकच्या ३२ विद्यार्थ्यांची चाकण येथील फुकोकू इंडिया प्रा. लि. या जापनीज बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.

पालकांनी अशोक पॉलिटेक्निकवर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आधुनिक तंत्र शिक्षण देण्याचे कार्य पॉलिटेक्निक करीत आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक कंपन्या दरवर्षी विद्यार्थ्यांचे परिसर मुलाखती घेऊन नोकरीसाठी पहिल्या पसंतीत निवड करतात. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील धनंजय जंजिरे, प्रज्वल चव्हाण, स्वरूप कुर्हे, किरण सोमवंशी, संकेत दांगट, तेजस खैरे, शुभम कर्डिले, विशाल शिंदे, चेतन बनकर, अनिकेत चौधरी, शुभम गुंड, पवन शिंदे, आशिष थोरात, कुणाल पवार, रोहित सैन्दोरे, महेश सदरे, रोहित मोरे व ओंकार खराडकर तर केमिकल शाखेतील आयान पठाण, रोहन गाढे, वैष्णव मोरे, तुषार पावसे, आदित्य गिरमे, करण दमाले नरेंद्र फोफसे, नाजीम पटेल, प्रशांत बडाख व किशोर कोऱ्हाळे यांची निवड केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या निवडीबाबत संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे, अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राउत, सहसचिव भास्कर खंडागळे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे व कार्यकारिणी सदस्य विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, सौ. शितलताई गवारे ,प्राचार्य अंजाबापू शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अरुण कडू, विभाग प्रमुख प्रा. महेश नवपुते, प्रा. अनुजा मुरकुटे व प्रा. निलेश पवार आदिंनी अभिनंदन केले.  


 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण व कौशल्य हे बाहेर पडल्यास विकसित होतात.
कंपनीमध्ये काम करीत असताना इतर विभागातील माहिती करून घ्यावी. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एकमेकाशी संवाद करावा. मागील वर्षी फुकोकू कंपनीने निवड केलेले विद्यार्थी प्रोडक्शन पार्टस बनविण्यामध्ये उत्तमरित्या कुशल झाले आहे. याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे. ह्या परिसर मुलाखतीमुळे हुशार व होतकरू विद्यार्थ्यापर्यंत पोहचता आले.
दीपक कुलकर्णी, एच.आर. हेड मॅनेजर (फुकोकू इं.प्रा.लि. चाकण)
close