shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रस्ते झाले खड्डेमय,नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ! आजी,माजी,भावी नगरसेवकांनो आपण देणार का लक्ष ?

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील गोंधवणीरोडवरील कलगीधर हॉल पासुन ते लबडे पेट्रोल पंपापर्यंत हा गोंधवणीरोडचा पश्चिमेकडील उपमार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या रस्त्यावर वाहन चालविणारे वाहन चालक तथा पायी चालणारे पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे, याकडे संबंधित आजी,माजी, नगरसेवकांसह नगर पालिका प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर कमालीचे खड्डे पडले आहे,त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने  वाहन चालविणे अथवा पायी चालणे मोठे जिकरीचे ठरत आहे, शिवाय अपघातांचे प्रमाण वाढत असुन मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती देखील होत असल्याने शहरात रोगराईचा फैलाव होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

मात्र याकडे संबंधित नगर पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे,नगर पालिका निवडणुक लांबल्याने आजी,माजी,भावी नगरसेवक जणू भुमिगत झाल्याचे देखील दिसून येत आहे,करीता संबंधित नगर पालिका प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन शहरवासियांना सतावत असलेल्या ज्वलंत समस्यांचा त्वरित निपटारा करणेकामी पुढे यावे किंवा आजी,माजी,भावी नगरसेवकांनी तरी याकडे लक्ष द्यावे अशी नागरीकांतुन मागणी होत आहे.
close