नगर । प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आज सगळीकडे काँक्रीटचे जंगल पसरत आहे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्यामुळे वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांना, समाजाला वृक्षांचे महत्त्व समजावे यासाठी वृक्षांचे संवर्धन, संरक्षण याची जाणीव बालवयातच होण्यासाठी तसेच समाजात पर्यावरण जागृतीचा संदेश पोहोचवण्यासाठी विद्यालयात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात होते.
सदर वृक्षदिंडी विद्यालयापासून निघून कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे नेण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात हातात झाडाची रोपे घेऊन वृक्षदिंडीत उत्साहाने सहभागी झाले. विद्यालयाचे गुरुकुल शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब ढोमसे यांनी याप्रसंगी वेगवेगळ्या १०० वृक्षांची रोपे विद्यालयास भेट दिली, हीच रोपे वृक्षदिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना घरी वृक्षारोपण करण्यात देण्यात आली,विद्यार्थ्यांमध्ये एक मूल- एक झाड ही संकल्पना रुजवण्यास प्रोत्साहन देण्यात आले.यावेळी प्राचार्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री चौरे प्रकाश सर पर्यवेक्षक श्री तुपे सुरेश व श्री.कुदळे लक्ष्मण गुरुकुल शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब ढोमसे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. शिवाजी जुंधारे ज्यूनिअर विभाग प्रमुख श्री. राजेंद्र सोनवणे, श्री.सतीश पाडवी श्री.महेंद्र गावित श्री. उदेसिंग डुडवे व इतर सेवक उपस्थित होते.
सदर वृक्षदिंडी आयोजन व यशस्वीतेसाठी श्री.योगेश ठाकरे श्री.बापूसाहेब मोरे श्री.रामदास धादवड यांनी प्रयत्न केले.

