shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झाड कोसळल्याने घरांचे नुकसान!▪️


पिडीत कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवारांनी दिली आर्थिक मदत!

चंद्रपूर-▪️किरण घाटे▪️

  

झाड कोसळल्याने घरांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी रयतवारी काॅलरी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सदरहु परिसराला भेट देत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली .यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, माजी नगर सेवक राजेश रेवल्लीवार, शंकर दंतुलवार आदिंची उपस्थिती होती.





▪️चंद्रपूरात पावसाचा जोर जरी मंदावला असला तरी या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. अशा कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत केल्या जात आहे. दरम्यान आज कडूलिंबाचे झाड कोसळल्याने रयतवारी येथील सुरेश सदनलवार, राजु झंजलवार, शुभम पोतनवार आणि सुरज अडपेवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवारी काॅलरी परिसरात जात सदरहु नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. व त्या कुटुंबीयांना आमदार  जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली. तसेच प्रशासनातर्फेही सदरहू कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले .

close