येडेश्वरीने शेतकऱ्यांना एकूण 2500 रूपये भाव दिला.
शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला.!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
येडेश्वरी कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हित जोपासत आला असून सन 2021-22 या हंगामामध्ये ऊसाचा 2100 रु चा पहिला हप्ता शेतकर्यांना या पूर्वी देण्यात आला.त्यावेळी बजरंग सोनवणे यांनी 2500 रू भाव देऊ असे शेतकऱ्यांना अश्वासन दिले होते.त्यानुसार आज दि.1.08.2022 रोजी 400 रु चा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला.तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने येडेश्वरी कारखाना सतत विचार करत आलेला आहे.
यापुढेही कारखाना शेतकऱ्यांचे हित पाहील. सर्वाधिक भाव देणारा येडेश्वरी साखर कारखान्याने दिला. तालुक्यामध्ये यावर्षी ऊसाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होती .आपला ऊस शिल्लक राहणार कि काय अशी भीती शेतकर्यांना होती. परंतु संपूर्ण ऊसाचे गाळप करून येडेश्वरी कारखान्याने 842616 मे.टन ऊसाचे गाळप करून शेवटी कारखान्याच्या क्षेत्रातील ऊसाचे गाळप करूनच कारखाना बंद करण्यात आला. शेतक-यांचे हित लक्षात घेऊन यापुढेही कारखाना यशस्वीरित्या चालवला जाईल असे प्रतिपादन येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले.


