प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज तालुक्याच्या शेतकरी पुत्राने साखर कारखानदारीच्या उज्वल इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व येडेश्वरी उद्योग समुहाचे संचालक बजरंग सोनवणे यांनी कारखानदारीत आता पश्चिम महाराष्ट्रात कूच केली आहे . त्यांनी आर्यन शुगर , खामगाव ( ता . बार्शी ) हा साखर कारखाना विकत घेतला असुन कारखान्याचा ताबा देखील मिळाला आहे .
येडेश्वरी साखर कारखान्याप्रमाणे आर्यन साखर कारखान्याचा कारभार चोखपणे हाकत ऊस उत्पादक शेतकरी , कारखाना कर्मचारी , ऊसतोड कामगार , वाहन चालक मालकांचे हित जपण्याचे काम आम्ही करणार आहोत असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे . हा कारखाना विकत घेऊन सोनवणे यांनी पश्चिम महाराष्ट्रात कारखानदारीत कूच केली आहे . त्यामुळे या कारखान्यास गाळपासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांस ऊस बिलाबाबत चिंता करण्याची गरज नसून , कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचे भविष्य चेअरमन बजरंग सोनवणे यांच्या धाडसी निर्णयामुळे उज्वल ठरणार आहे .


