वांबोरी : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे खडांबे खुर्द येथील श्री शाहू विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 75 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमाने सर होते सकाळी मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गावच्या ग्रामस्थांनी ठेवलेल्या गुणवंत विद्यार्थी ठेव योजनेतून सर्व इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्गात प्रथम आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा नृत्य स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान धामोरी खुर्द धामोरी बुद्रुक खडांबे खुर्द बुद्रुक या ठिकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन ही करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राम फळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते श्री आप्पासाहेब शिंदे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. राहुल जाधव सर यांनी केले.
या प्रसंगी सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, मा.सरपंच प्रभाकर हरिश्चद्रे,नानासाहेब पवार, स्कोडनलीडर कल्हापुरे साहेब, हरिश्चंद्रे् महाराज,श्यामराव खेस्माळसकर, गुलाब पवार, भरत पवार,बाळासाहेब जठार, दिलीप जठार,माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके, भानुदास कल्हापुरे, बाबसाहेब सोनावणे,माजी सदस्य ग्रामपंचायत खडांबे खुर्द आणि धामोरी याचबरोबर इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील पर्यवेक्षक नरवडे सर,शिक्षक श्री रोकडे सर, बांगर सर ,साठे सर, कारले सर, साबळे सर, कुऱ्हे सर, दुशिंग सर, त्याच प्रमाणे श्रीमती आसाल मॅडम,म्हस्के मॅडम, चौधरी मॅडम, डंबरे मॅडम, कल्हापुरे मॅडम, तसेच श्री सय्यद सर सर थोरात सर ,थोरात जी. आर., मेहत्रे सर आदींनी परिश्रम घेतले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

