नीरा भीमा कारखान्यावरती स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात.
बावडा: प्रतिनिधी दि.16/8/22
शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी सोहळा सोमवारी (दि.15) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्याला आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. देशाच्या कृषी - सहकार - औद्योगिक क्रांतीमुळे ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. आपले नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नीरा भीमा कारखान्याची स्थापना केल्यामुळे या परिसराचे नंदनवन झाले आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी भाषणात नमूद केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे, कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, कर्मचारी कालिदास आवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुधीर गेंगे पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, प्रकाशराव मोहिते, भागवत गोरे, सुभाष पोळ, मोहन गुळवे, माणिकराव खाडे, के. एस. खाडे, हरिभाऊ देवकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.
_______________________________

