shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चाकाटी गाव आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चाकाटी गाव आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेद्वारे इंदापूर तालुक्यातील चाकाटी गावचा तालुका जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला असून त्या पुरस्काराचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे येथे चाकाटी गावचे सरपंच संजय बबन रुपनवर व ग्रामसेवक स्वप्निल गायकवाड यांनी स्वीकारला .
यावेळी नवनाथ रुपनवर ,भारत मारकड ,केशवकाका मारकड, सुभाष मारकड, केशव  वाघमोडे, विजय मारकड, समाधान घोडके, महेंद्र कांबळे ,माऊली ननावरे ,गणपत मारकड इत्यादी चाकाटी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
 सन २०२१-२२ या वर्षात आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषांमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने चाकाटी गावचा स्मार्ट ग्राम म्हणून गौरीविण्यात आले.
close