shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडून कोळपेवाडी पोलीस दूरश्रेत्र परीसरात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते 75 झाडांचे वृक्षारोपण..!

शिर्डी ।  प्रतिनिधी ( संजय महाजन ) :-
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येत असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आदेश शासनामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडून कोळपेवाडी पोलीस दूरक्षेत्र परिसरात 75 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव उपस्थित होते.वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून, वृक्षांचा होत असलेला मृत्यू हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा हळूवारपणे होत असलेला अंत आहे. हे ध्यानात घेऊन मानवाने वृक्षाची लागवड व संवर्धन करावे,असे आवाहन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.या प्रसंगी माजी सभापती वाल्मिक अप्पा कोळपे, कोळपेवाडी चे सरपंच सूर्यभान कोळपे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब नाना कोळपे, सुरेगावचे उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर दिलीप गोरे शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे,उपाध्यक्ष तालुका आय कोंग्रेस शब्बीर भाई सरपंच मढी बु चे सरपंच भागवत, कोळपेवाडी. ग्रामपंचायत सदस्य श्री महेश कोळपे , कोळगाव थडी चे सामाजिक कार्यकर्ते पुंजाजी राऊत, बाळासाहेब ढोमसे, अमर लोंढे,पत्रकार विशाल लोंढे, गणेश बत्तासे कोळपेवाडी पोलीस दूरक्षेत्राचे राजु चव्हान, विलास कोकाटे दादा,अनिसभाई शेख, नवनाथ गुंजाळ,किसन सानप दाआनंद साळवे,अविनाश तमनर, दिपक साळवे,संजय वाबळे पोलीस पाटील पोलीस मित्र किरण शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी 75 झाडांच्या सुरक्षेतेसाठी संरक्षण जाळी देऊन सहकार्य केले.
close