shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाचनाची आणि पुस्तकांची आत्मीयता जीवनाला अमूल्य बनविते = डॉ.राम बोरुडे

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : 
डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे घर  म्हणजे पुस्तकमंदिर आहे, त्यांचे असंख्य पुरस्कार आणि भरपूर पुस्तकसंग्रह हीच खरी श्रीमंती आहे, त्यांच्या भेटीने आणि पुस्तके देण्याने खरे समाधान मिळाले, वाचनाची आणि पुस्तकांची आत्मीयता ही जीवनाला अमूल्य बनविते असे विचार टाकळीभान येथील जिल्हा आरोग्य केंद्रातील डॉ. राम बोरुडे यांनी व्यक्त केले. 

येथील साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या साहित्यसेवेबद्दल डॉ. राम बोरुडे यांनी त्यांचा सन्मान करून पुस्तके भेट दिल्याबद्दल त्यांनी  समाधान व्यक्त करताना ते बोलत होते. गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत करून डॉ. राम बोरुडे यांचा तर सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सौ. प्रीती बोरुडे /दातीर यांचा सत्कार केला. प्रा. सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी सांगितले की, बालपणापासून पुस्तके हेच आमचे संस्कारकेंद्र राहिलेले आहे.डॉ. राम बोरुडे आणि डॉ.सौ.प्रीती बोरुडे यांच्या पुस्तकप्रेमाबद्दल प्रा.पल्लवी सैंदोरे यांनी समाधान व्यक्त केले. 

डॉ.राम बोरुडे यांनी सांगितले की, डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकांचा मी बालपणापासून वाचक आहे.सन १९९५ ला त्यांचा 'निवडुंगाची फुलं 'हा कवितासंग्रह प्रकाशित झाला ते वाचून आनंदी झालो आणि सन‌ १९८५ मध्ये त्यांच्या 'पोरका' या आत्मकथनाने मन अतंर्मुख झाले. आज त्यांची पुस्तके मिळाली हे समाधान फार मोठे आहे,असे डॉ. बोरुडे यांनी मत व्यक्त केले. निर्मिक उपाध्ये, आराध्या सैंदोरे, वेदश्री बोरुडे इत्यादी उपस्थित होते.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले.
close