shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निसर्गाच्या सान्निध्यात वृक्षारोपण करून- वाढदिवस केला साजरा - शेखर काळभोर

लोणी काळभोर  - तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर लोणी काळभोर येथील डोंगर परिसरात दि.३१ जुलै २०२२ रोजी  श्री.शेखर मधुकर काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी वड,पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांबुळ, बेल,लक्ष्मीतरू, खैर,उंबर, कंरज अशा  १५ फुटी १०१ देशी झाडे लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला.

          या वेळी श्री.शेखर भाऊ काळभोर, वन विभाग अधिकारी श्री. वाईकर साहेब, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन उपाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, काकासाहेब काळभोर,जीवन जाधव, बिरूदेव भास्कर,किरण भोसले,राहुल कुंभार, सिद्धार्थ खंडागळे, हुमे सर,,नानासाहेब देशमुख, बाबासाहेब घोडके, उपस्थित होते. 
     मुलांना द्यावे एकचं शिक्षण,वसुंधरे मुळे आहे आपलं रक्षण. करावीच लागेल वृक्षांची रक्षा, तेंव्हाच निश्चित जिवन सुरक्षा जसे पाणी आहे प्रत्येक जीवा सजीवाचा श्वास, तसे झाडावेलींना पाहुन मनी जन्म घेते जगण्याची आस! असे वाईकर साहेब यांनी प्रतिपादन केले.
तसेच ग्रीन फाऊंडेशन, वनविभाग लोणी काळभोर, जनाई शिक्षण संस्था, गिरीश विभा ट्रस्ट वनव्यवस्थापन समिती उपस्थित होते.
close