shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांचे सेवा करणे म्हणजेच ही खरी ईश्वर सेवा - माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांचे सेवा करणे म्हणजेच ही खरी ईश्वर सेवा - माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:निवडणुका येथील जातील कुठे मतदान करायचे ते जनता ठरविल परंतु आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांचे सेवा करणे म्हणजेच ही खरी ईश्वर सेवा आहे.असे  सणसर (ता. इंदापूर) येथे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना दत्तात्री भरणे यांनी  आपले मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, जि.प. सदस्य प्रताप पाटील, अभिजीत तांबिले,  जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, सरपंच एडवोकेट रणजित निंबाळकर, उपसरपंच सौ. ज्योत्स्ना भोईटे, विजयसिंह निंबाळकर, संजयभैया निंबाळकर,  छत्रपती साखर कारखान्याचे संचालक डॉ. दीपक निंबाळकर,गणेश झगडे, सणसर सोसायटीचे चेअरमन परशुराम रायते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन निंबाळकर, यशवंत नरुटे, दादासाहेब वनवे, अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, वसंतराव जगताप, प्रशांत पवार, अमोल भोईटे, बजरंग रायते, श्रीनिवास कदम, पृथ्वीराज जगताप, सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. चारुदत्त आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की,लांब कुठेतरी जाऊन देवाची सेवा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने गोरगरिब रुग्णांची सेवा करणे त्यांना मदतीचा हात देणे, घरातील आई-वडिलांकडे लक्ष देणे हीच खरी इश्वर सेवा आहे
या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होणार असून या आरोग्य तपासणीनंतर शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. हे शिबिर आयोजित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ , एडवोकेट रणजित निंबाळकर व विक्रम निंबाळकर तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले व त्यामुळेच आज या शिबिरामध्ये अनेक रुग्ण तपासणी करणार आहेत.

सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांनी संपूर्ण इंदापूर तालुका दत्तक घेतला असून या तालुक्यातील गोरगरीब जनतेची रुग्णांची खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीची सोय झालेली आहे. या शिबिरामध्ये बायपास सर्जरी, एनजीओप्लास्टी, वॉल व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, कर्करोग केमोथेरपी, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस लहान मुलांच्या रुदय शस्त्रक्रिया अशाप्रकारे या शिबिरामध्ये विविध प्रकारे तपासण्या करून ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची गरज वाटत आहे अशा रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

गोरगरिबांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीचे ऑपरेशन करायचे ठरले तर किंवा ती व्यक्ती आयसीयू मध्ये असेल तर एका वेळेचे मेडिकल बिल कमीत कमी १५ ते २० हजार रुपये येते यावेळी त्या कुटुंबातील व्यक्ती एवढा आर्थिक भार सहन करू शकत नाही. घरातील जे काही किडूक मिडूक सोन असेल ते सोनं मोडून देखील दवाखान्याचा खर्च या गोरगरिबांना भागवता येत नाही. अशावेळी खऱ्या अर्थाने या गोरगरिबांना दवाखान्याबाबत मदतीची गरज असते व ती मदतीची गरज ओळखूनच गोरगरीब जनतेसाठी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

कोविड काळात देखील रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत झालेले असून जेवढे शक्य आहे तेवढे गोरगरिबांसाठी कोविड काळात देखील काम केलेले आहे.

 इंदापूर तालुक्यातील ज्या व्यक्तींना जगण्याचा मार्ग मिळत नव्हता त्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची देखील मदत करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आज मनापासून जनतेबद्दल माझ्या मनात प्रेम आहे.आणि माझ्याबद्दलही जनतेच्या मनात कायम प्रेम राहणार आहे. ते म्हणजे असा एक मंत्री व आमदार होता की  तो कायम गोरगरिबांच्या मदतीला हाकेला उभा राहत होता व हीच खऱ्या अर्थाने माझी ओळख असल्याने पुढील काळात देखील सत्ता असोवा नसो मी कायम गोरगरीब जनतेसाठीच काम करत राहणार आहे

(चौकट):
 माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मंत्री असताना मुंबईमध्ये एक स्वीय सहाय्यक पुण्यामध्ये एक स्वीय सहाय्यक अशाप्रकारे रोज जे काही इंदापूर तालुक्यातील रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी जातील त्यांची सोय योग्यरित्या करण्यासाठी या दोघांना त्या ठिकाणी थांबवण्यात आले होते. यामुळे भरणे यांचे गोरगरीब जनतेबद्दल मनापासून असलेले प्रेम दिसत आहे व त्यामुळे इंदापूर तालुक्यातील कित्येक नागरिकांना आरोग्यसेवा योग्य मिळाली आहे.- जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य सचिन सपकळ.
close