प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २२ / नगर तालुक्यातील आढाववाडी येथील भगवान बिरोबा महाराज मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा गुरुवर्य श्री . जंगले महाराज शास्त्रीजी अहमदनगर यांचे उपस्थितीत मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला .
लोकवर्गणीतून बिरोबा मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले . या देवस्थानला कोणीही विश्वस्त ट्रस्टी नाही . मंदिराचे पूर्ण काम लोक सहभागातुन करण्यात आले आहे . यावेळी जंगले महाराज शास्त्रीजी यांचे किर्तन झाले . किर्तनात त्यांनी उपस्थितांना प्रपंचा बरोबर परमार्थच मानवाला तारू शकतो असे सांगितले . किर्तनानंतर महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला . बिरोबा महाराज मंदिरा समोर सभामंडपाचे काम करण्याचे नियोजन असुन सर्वांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .
डोंगरगण गावा जवळील आढाववाडी येथील विरभद्र मंदिर नवसाला पावणारे व जागृत देवस्थान मानले जाते . पंचक्रोशीतील भाविक भक्त याठिकाणी दर्शनाला येतात .
समस्त गावकरी व पंचक्रोशीतील व्यक्तींचा या देवावर अगाध विश्वास आहे . नवसाला पावणारा विरभद्र म्हणुन या देवाच्या दर्शनाला अनेक भाविक भक्त येतात . यावेळी पुजारी नाचण यांनी सांगितले की, सर्व दानशुर व्यक्तींनी मंदिराच्या सभामंडपासाठी व इतर कामांसाठी मदत करावी . देणगीसाठी ९८८१०२५०५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .
यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते . अँड. विलास गवारे ,बाजीराव गवारे, मोळेबाबा घोरपडे , डोंगरगणचे सरपंच सौ.मते, पंढरीनाथ आढाव ,काशीनाथ आढाव , पिंपळगावचे सरपंच सौ .प्रभुणे , भुतकर साहेब कारभारी घोरपडे ,सचिन आढाव,बाबासाहेब घोरपडे , नवनाथ आढाव, साहेबराव आढाव , मंदिराचे पुजारी सुभाष नाचण, चंद्रकांत वायकर , काशीनाथ आढाव, रावसाहेब आढाव , बाजीराव गवारे, शरद झेंडे ,चंद्रकांत भागवत आदी उपस्थित होते .

