आत्मदहन करण्याची वेळ कोणी आणली...?
प्रतिनिधी : शिवा म्हस्के
रुईछत्तीसी : १४ / नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील एका शेतकर्यांनी प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर माहिती प्रमाणे
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथुन राष्ट्रीय महामार्ग नगर सोलापूर क्रमांक '५१६ अ" जात आहे. रुईछत्तीसी गावातील शेतकर्याची २.५ एकर शेतजमीन भुसंपादन मध्ये जात आहे. या गट नंबर मध्ये सन २०१६ मध्ये दोन शेत तळे झाले आहे. या भुसंपादन मध्ये एक शेततळे मोबदला मिळाला आहे.आणि एक शेततळ्याचा मोबदला मिळणे बाकी आहे.या साठी शासकीय दरबारी पाठपुरावा सुरू आहे. हा शासकीय भोंगळे कारभारात नगर महसूल कडुन गौण खनिज उत्खनन केल्याबाबत तब्बल १८००ब्रास माती मुरूम उत्खन झाल्याबाबत संबंधित शेतकरयांला नोटीस बजावण्यात आली. ज्या काळात हि नोटीस बजावली त्या काळात महसुल विभागाचे प्रत्येक तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय यांना वसुली उदिष्ट आकडा गाठण्यासाठी रुईछत्तीसी येथील रस्त्यांच्या कडेलाच असलेल्या शेतकरयांला या महसूल उदिष्टाचा बळीचा बकरा बनविण्यात आले आणि लाखो रुपयांची नोटीस बजावण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांनी या नोटीसेला लेखी स्वरूपात उत्तर दिले गेले परंतु संबंधित नोटीस बाबत विचारणा केली असता त्या प्रकरणात बाबतीत पुढे काय झालं या बाबतीत संबंधित शेतकऱ्यांला समाधानकारक उत्तर आज पर्यंत मिळालेले नाही.
नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मध्ये शेतजमीन भुसंपादन संपादक स्वमालकीच्या शेत जमीन पैसे काढण्यासाठी शेतकर्यांनी टक्केवारी मागणी होत आहे. या राष्ट्रीय महामार्ग मध्ये काही शेतकरी अल्पभूधारक भुमीहीन झाले आहे. वरती या प्रशासकीय अधिकारी भुसंपादन शेत जमीन पैसे काढण्यासाठी या ना त्या मार्गाने पैसा वसुली करत आहे.या टक्केवारी अनेक शेतकरी कुजबुज करतं आहे. या साठी खास माणसांची नियुक्ती केली आहे. खास माणसा मार्फत या सर्व व्यवहार देवाण घेवाण होते आहे. दक्षिण खासदार डॉ सुजय विखे पाटील तसेच नगर राष्ट्रीय महामार्ग प्रशासकीय अधिकारीची वाटेफळ या गावात या ठिकाणी रस्ता समस्या भुसपंदान विषयी शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकारी समोरच भुसंपादन पैसे टक्केवारी पाडा वाचुन दाखवला होता. परंतु या वरती ना खासदार साहेब यांनी कारवाई साठी प्रयत्न केले ना जिल्हाधिकारी साहेब यांनी या मधुन महसूल विभागाचे अधिकारी आणखी टक्केवारी रक्कम आकडा वाढत गेला.
अनेक शेतकरी न्याय साठी झगडत आहे. काही शेतकरी न्यायालयात जाण्याची तयारी आहे.काही शेतकरी न्यायालयात गेले आहे.
रुईछत्तीसी येथील जगदाळे नामक शेतकर्यांला राष्ट्रीय महामार्ग मध्ये भुसंपादन मोबदला मिळाला नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला असा ३५३ गुन्हा दाखल करण्याची वारणा धमकी प्रशासन देत आहे.तसेच या शेतकर्यांचा मुलाला व्हाटसअप काॅल करून समजुन सांगा उगाचच सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून ३५३ गुन्हा दाखल केला जाईल अशी धमकी पुन्हा देण्यात आली.
वर्ग एकचे अधिकारी जनतेचे काम न करता एक कंपनीचे एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर येत आहे. असे पुराव्यानिशी संबंधित शेतकऱ्यांनी आयुक्त साहेबांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नगरचे प्रांत अधिकारी यांनी हि कारवाई काम एका राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून केल्याचे म्हटले आहे. तसेच नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मध्ये शासकीय नियमानुसार ऐने केलेल्या जमिनीचा मोबदला काहीना आज पर्यंत दिलेला नाही.तर काहीना तडजोड करून एने जमीनीचा मोबदला देण्यात आला आहे.
या मध्ये शासनाची फसवणूक प्रशासकीय अधिकारी नियम धाब्यावर बसवून हे काम करत असल्याचे बोले जात आहे.
तसेच ज्यांनी मांडवली केली ईतर हक्कातील नाव हरकत अर्ज यांचा कोणताही विचार न करताच संबंधित ठरलेल्या रक्कमेची टक्केवारी प्रमाणे पैसे अदा केल्याचे अनेक प्रकरणे समोर आलेले आहे. या अधिकार्यांनी आपल्या पदाचा वापर शेतकऱ्यांना न्याय देणं अपेक्षित असताना देखील पदाचा गैरवापर करून हा त्रास दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
एका बाजूला भारत देशाचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महसूल अधिकारी व कंपनी हिटलशाहीनी शेतकऱ्यांला आत्मदहन करण्याची वेळ आणली आहे.१५ ऑगस्ट रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आत्मदहन संबंधित अधिकारी कंपनी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मी मेल्यानंतर माझ्या मुलांना तरी या शासकीय कार्यालयात नाहक हेलपाटे मारायची वेळ येऊ देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

