अकोले । प्रतिनिधी :-
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षे सातत्याने भूमिका घेणारे संघर्षशील नेते शिवसंग्रामप्रमुख माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षणाचा महानायक हरपला आहे अशा शब्दांत अकोले तालुका मराठा महासंघाचे वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
विनायकराव मेटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केले. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. ते विधानपरिषद सदस्य असताना अनेक वेळा समाजाचे प्रश्न उपस्थित करीत होते. त्यांनी गरीब मराठा समाजाच्या प्रश्नासाठी नेहमी ठोस भूमिका घेतली. मराठा आरक्षणासाठी ते सतत लढत राहिले. मराठा आरक्षण परिषदेला ते उपस्थित राहिले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समर्पित करणारा एक झुंजार महानायक दिवंगत विनायक मेटे यांच्या रूपाने हरपला आहे. मराठा महासंघाचे विजय पोखरकर, भाऊसाहेब वाकचौरे पाटील, ओम काळे, लालूशेठ दळवी, राजेंद्र गवांदे, भानुदास गायकर, शिवाजी पाटोळे, अशोक आवारी, वर्षाताई चौधरी, कैलास वाकचौरे, सुशांत वाकचौरे, अक्षय अभाळे, कैलास जाधव, ईश्वर वाकचौरे, अमोल मोरे, केशव बोडके, डॉ सचिन दातीर यांनी दुःख व्यक्त केले.

