तिरंगा भजे ..
स्वातंत्र्यदिनी अहा
हर घर तिरंगा सजे
आपला देश महान
डंका विश्वात वाजे
आबालवृध्द सगळे
देश भक्तीत भिजे
ईश्वर अल्लाह येशू
तिरंगा मनात भजे
ध्वज फडकता उंच
आकाश होते खुजे
सर्वंधर्म समभावाचे
बीज अंतरात रुजे
जन गण मन सूर ते
दहादिशात गा गर्जे
हातात धरता ध्वजा
समाधान नाही दुजे
स्वतंत्र भारता जन्म
सौभाग्य थोर माझे
माता पित्या सहीत
तिरंगामनात विराजे
ध्वज अवमान नको
हिंमत कुणाची धजे
लोकशाही नांदेसुखे
इथे सर्वं सेवक राजे
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
2)
अमृतमहोत्सव..
ध्वज संहिता समग्र
जाणून घेऊ माहिती
स्वर्ण इतिहास गातो
तिरंगा झेंडा महती
केशरी धवल हिरवा
तिरंगा आयताकृती
आबाल वृद्धां मनात
ठसली सार्थआकृती
अमृतोत्सव निमीत्ते
समजून घ्या संस्कृती
ध्वजारोहण करावया
आहे विशीष्ट पध्दती
ध्वज न मात्र निशाण
असे अमोल संपत्ती
रोचक आहे कहाणी
कशी झाली उत्पत्ती
सर्व पक्षा भिन्न झेंडा
करती तयावर प्रिती
तिरंगा सर्वां प्रियतम
सन्मानाचा सर्वाप्रति
स्वातंत्र्य अमृत वर्षाव
घेऊ अद्भुत अनुभूती
ध्वजाची विशेष निगा
उत्सव सरल्या वरती
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
3)
कागदी झेंडा ..
कागदी झेंडा छोटा
टाचला छान शर्टाला
टाचणी ती टोकदार
टोचली जरा बोटाला
रक्त आले थेंब भर
वेदना होती जीवाला
रक्ताळले बोट तेचं
दावीत फिरे सर्वांला
झेंडा हसला इवला
बोलू लागला मनाला
शहीदाचे ते बलीदान
आठवा इतिहासाला
रक्ताळल्या शरीरांनी
चुंबले हसत फासाला
राख रांगोळी घरांची
स्वतंत्र करती देशाला
चुककळे माझी मला
सलाम करे ध्वजाला
इवल्याशा झेंड्यानी
शिकविले रे खुजाला
--हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
4)
भारत माता ..
भारत माता स्वतंत्र
तुटले रे साखळदंड
शहीद शरीरां खच
रक्त वाहिले उदंड
इतिहास पाने चाळू
कळे विक्रम प्रचंड
आपणनव्हतो तेंव्हा
प्रयास चाले अखंड
पराक्रमाची सुगाथा
विविध प्रकारे बंड
वेदना झाली मैत्रीण
तुरुंग भरुन ओसंड
क्रुरते विरुद्ध सज्ज
थोपटून आपले दंड
सत्याग्रह जगज्जेता
पळाले अंतिम षंढ
शहिदांचे ते बलिदान
गाजले अवघे त्रिखंड
आहुती सार्थ ठरली
धगधगले अग्नी कुंड
प्रजासत्ताक भारता
ठेवू सार्वभौम अखंड
तिरंग्या लाभो जगती
सुदृढ आयुष्य उदंड
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
5)
ध्वजारोहण..
पूर करी वाताहात
काही नउरलं घरांत
सोनंनाणं गेलं सारं
धडकीभरली उरात
तिरंगामात्र सुरक्षीत
होता उंचबास्तनात
ठेवा मिळाला मोठा
मोद मावेना मनात
स्वातंत्र्य दिन साजे
देशप्रेम कणकणांत
विसरले दुःख सारे
असे कसे क्षणात
तिरंगा लहरता उंच
राष्ट्र गीत ते मुखात
सलाम करता तया
वृध्दी किती सुखात
करु उभं सारं पुन्हा
आमचे हातात हात
भारतीय बांधवांची
इथेविश्वासाची साथ
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com

