shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा समाजाच्या सामाजिक प्रश्नासाठी लढा देणारे नेतृत्व हरवले ... रमेशराव आडसकर..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 

बीड जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नावर लढा देणारे माजी आमदार विनायक मेटे हे होते.विधान परिषदेवर आमदार म्हणुन सलग पंचवीस वर्ष राहुन मराठा आरक्षणावर लढा देणाऱ्या  नेतृत्वाचा शेवट मेटे यांच्या अपघाती निधनाने झाला असे प्रतिपादन भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी केले.ते केज छञपती संस्थेच्या व माजलगाव ,केज मतदार संघाच्या वतिने आयोजित. 


 


कै.विनायक मेटे यांच्या श्रद्धांजलीच्या शोक सभेत बोलत होत. रमेशराव आडसकर पुढे म्हणाले की सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातुन राजेगांव सारख्या खेड्यातुन ते पुढे गेले होते.मराठा आरक्षणासाठी लढुन सर्व सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिला होता असे रमेश आडसकर यांनी सांगितले.
     
या कार्यक्रमात केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड,हारुणभाई इनामदार ,लक्ष्मीकांत लाड,रवी अंधारे,बालासाहेब गलांडे, भुतडा,प्रा.हनुमंत भोसले ,शिवाजी हजारे,अशोक सोनवणे ,शिवाजी घुले,शकिल सय्यद व इतर उपस्थित होते

या प्रसंगी भावपुर्ण वातावरणात नगराध्यक्षा बनसोडे,हारुणभाई इनामदार,बालासाहेब गलांडे,कराड यांनी आपले अनुभव व्यक्त केले. केज तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातुन पुढे गेलेले व शिव संग्रामच्या माध्यमातुन ते सर्व महाराष्ट्राला परिचित झालेले मेटे साहेब इतक्या लवकर जातील असे कुणालाच वाटले नाही अशाच शब्दांत सुञसंचालन हनुमंत भोसले यांनी केले.

शेवटी दोन मिनिटे स्तब्ध राहुन श्रद्धांजली अर्पण केली.
केज शहरातील सर्वच प्रतिष्ठित नागरीक,सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.
close